पुणे : भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी ठेकेदारांनी न केलेल्या कामांची बिल काढण्यासाठी पुणे महानगर पालिकेच्या कार्यकारी अभियंता सुश्मिता शिर्के यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून कांबळेंवर टीकेची झोड उठली आहे. तसेच त्यांच्या आमदारकीचा राजीनामा आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुण्यातील महिला शिवसैनिकांनी सुनिल कांबळे यांच्या कार्यालयासमोर त्यांची खण आणि नारळ ठेवून ओटी भरत त्यांचा निषेध केला आहे. यावेळी कसबा आणि कोथरूडच्या शिवसेना संपर्क संघटिका स्वाती ढमाले यांनी चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला आहे.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या कायम महिलाबाबत, महिलांच्या संघर्षाबाबतखणा, नारळाची ओटी ठेवून कांबळेंचा निषेध; पुण्यात महिला शिवसैनिक आक्रमक बोलत असतात त्यांना विचारु इच्छिते की, हीच भाजपची संस्कृती आहे का? भाजपच्या या संस्कृतीला तुम्ही घरचा आहेर देणार का? या संस्कृतीला तुम्ही आवर घातला नाही तर, तमाम महाराष्ट्रातील जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत राहणार नाही, असा गंभीर इशारा यावेळी स्वाती ढमाले यांनी दिला आहे.
अभियंता सुश्मिता शिर्के यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांनी शिर्के यांची माफी मागावी. राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. शिवसेनेच्या सरकारमध्ये एकाही महिलेविषयी अपशब्द खपवून घेतला जाणार नाही, अश्लिल भाषेत शिवीगाळ करणाऱ्या सुनिल कांबळेंची गय केली जाणार नाही, असंही ढमाले म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
- आमदारकीचा माज घरी दाखवा सुनिल कांबळे; महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी चाकणकर आक्रमक
- इमरान हाश्मी साकारणार आणखीन एका हॉरर चित्रपटात मुख्य भूमिका
- ‘…तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; आठवलेंचा सवाल
- हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा-सोमय्यांचे आव्हान


