Share

गॅस दरवाढीवरून MIMचं आंदोलन, रिकाम्या सिलिंडरची प्रतीकात्मक प्रेतयात्रा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाल्याने त्याचा परिणाम सामान्य माणसावर होतो. महागाई वाढत असल्याने कौटुंबिक खर्चावर त्याचा ताण पडतो. गँस व इंधनाची दरवाढ मागे घ्यावी यासाठी शहरात एमआयएमने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ‘अक्कड बक्कड बम्बे बो 80..90..पुरे सौ’ या घोषणा देत, मोदी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी खाली गॅस सिलिंडरची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून तीव्र धरणे आंदोलन केले.

यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. त्यानंतर आपल्या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त यांना शिष्टमंडळाने सादर केले. लवकर इंधन व गँस सिलेंडरचे दर केंद्र सरकारने कमी केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

आगामी महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छूकांची यावेळी गर्दी झाली होती. याप्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद, नासेर सिद्दीकी, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, शेख अहेमद, फेरोज खान, आरेफ हुसेनी, विकास एडके, हाजी इसाक खान, अबुल हसन हाश्मी, रफत यारखान, अब्दुल अजीम, रफीक पालोदकर, राजु पठाण, वाजेद जागिरदार, अब्दुल अजीम इन्कलाब, शेख नदीम, जिशान देशमुख, आसेफ पटेल, शेख शाएब, डॉ. मोईन, शेख आवेज, शेख सलमान, सय्यद निसार कादरी, सलीम पटेल बोरगावकर आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!