औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पालोद व शिवना जि.प.सर्कल मधील डोंगरगाव, मंगरूळ, अन्वी, पालोद, सारोळा, शिवना, आमसरी, नाटवी, वडाळी, वाघेरा आदी गावांमध्ये ग्रामविकास विभाग अंतर्गत जवळपास ६ कोटी ७५ लाख रुपयांच्या मंजूर कामाचे भूमिपूजन तसेच शिवसेना, युवासेना व शिवसेना महिला आघाडी शाखेच्या नामफलकाचे उदघाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रविवार ( दि.२२) संपन्न झाले.
पालोद सर्कल मधील डोंगरगाव येथे शादिखाना, डोंगरगाव ते दहीगाव रस्त्याची सुधारणा करणे, डोंगरगाव येथील शादिखाना परिसरात वधुवर कक्ष, सुशोभीकरण करणे, डोंगरगाव येथे दहीगाव चौफुली ते इक्लास मस्जित पर्यंत रस्ता करणे, मौजे मंगरूळ येथे मारोती मंदिर समोर पेव्हर ब्लॉक बसविणे, आधारबन ते रजाळवाडी रस्ता तसेच रजाळवाडी ते मंगरूळ रस्ता करणे, मंगरूळ कमान ते दत्तवाडी रस्ता करणे, अन्वी येथे गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे, अन्वी येथे व्यायाम शाळा साहित्य पुरवठा करणे, अन्वी येथील वाल्मिकवाडी येथे पेव्हर ब्लॉकसह रस्ता करणे, पालोद येथे विनोद पेट्रोल पंप ते सारोळा शिव रस्ताच्या कामांचे उद्घाटन झाले.
पालोद येथे मारोती मंदिर जवळ हायमास्ट लाईट बसविणे, पालोद येथे शेख शमीम यांच्या घरापासून ते मस्जिदपर्यंत रोड करणे, पालोद येथे मारोती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे, पालोद येथे पशुवैद्यकीय दवाखाना ते सोनवणे यांच्या शेतापर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे, सारोळा येथे महादेव मंदिर परिसरात सभागृह बांधकाम करणे, रहिमाबाद ते सारोळा रस्ता दुरुस्ती करणे, सारोळा फाटा येथे बसथांबा शिवना, आमसरी, नाटवी, वडाळी, वाघेरा या गावात गावअंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, पथदिवे, हायमास्ट, स्मशानभूमी शेड,कब्रस्थान संरक्षण भिंत, सांस्कृतिक सभागृह आदी विकास कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाची सुरुवात नमस्ते ट्रम्पने आणि आता जन आशीर्वाद यात्रा काढून आणखी आमंत्रण दिलं जातंय’
- चालत्या एसटी महामंडळाच्या बसची दगड मारून काच फोडली
- अफगाणिस्तानातून परतलेल्या १४६ भारतीयांपैकी दोघांना कोरोनाची लागण
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आग्रह धरला होता, वंचित आघाडीची भूमीका
- एल्गार परिषदेसह भीमा कोरेगाव हिंसाचार; शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोप निश्चिती प्रक्रियेला सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

