अकोला : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी नव्याने मागणी जोर धरत आहे. या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याची माहिती आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील आग्रही होते, अशी माहिती देखील त्यांनी दिली. विदर्भावर होत असलेल्या अन्याय पाहता छोट्या राज्यांची कल्पना योग्य होती, असा दावाही त्यांनी केला.
भाषवार प्रांत रचनेमध्ये देखील छोट्या राज्यांची कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. छोट्या राज्यात सरकारला साधनांचा वापर सर्वांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होते. मात्र, राज्ये मोठी असतील तर ही साधने सर्वांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. त्यामुळे विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास महामंडळाचाही फारसा उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचा मात्र, या मागणीला तीव्र विरोध आहे. भाजप नेत्यांचा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला छुपा पाठिंबा आहे. आता वंचित बहुजन आघाडीचाही या मागणीला पाठिंबा मिळाला आहे. या सर्व प्रार्श्वभूमीवर ही मागणी आता जोर धरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दहीहंडीला परवानगी द्या नाहीतर आंदोलन करु’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- श्रुती मराठेचा साडीमधील सुंदर लुक चाहत्यांच्या पसंतीस
- आर माधवनच्या मुलाची निरज चोप्रासोबत होत आहे तुलना
- ‘जनआशीर्वाद यात्रेला लोक आशीर्वाद नाही तर शिव्याशाप देत आहेत’-जयंत पाटी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

