औरंगाबाद : जालना येथून प्रवाशी घेऊन सिडको बसस्थानकात येत असताना चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयासमोर एकाने रोडच्या दुभाजकावर उभे राहुन बसच्या (क्रं. एमएच-२०- बीएल-२५६०) समोरील काचेवर दगड मारला.
यात बसची काच फुटली असून, १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चालक गणेश राऊत यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी आरोपीचा शोध घेत आहे.
जालना रस्त्यावरून सिडको बस स्थानकाकडे येत असलेल्या बस वर अज्ञाताने अचानक दगड मारून हल्ला केला. यात बसची समोरील एक काच फुटली. परंतु त्या अज्ञात माणसाने हे कृत्य का केले हे कोणालाच कळले नाही. बस आगारात नेऊन राउत यांनी तत्काळ सिडको पोलीस ठाणे गाठत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुजारा किंवा रहाणेच्या जागी सुर्यकुमारला तिसऱ्या कसोटीत संधी द्यावी’,- फारुख इंजिनीयर
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- गंभीर! कोरोनाची तिसरी लाट; पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा’, निती आयोगाच्या सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

