🕒 1 min read
मुंबई – शहरी नक्षलवादाप्रकरणी अटक असलेल्या १५ आरोपींवरील आरोप निश्चितीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी दहशतवादासारख्या गंभीर आरोपांसह १७ आरोपांचा मसुदा विशेष न्यायालयात सादर केला आहे. या मसुद्यावर विशेष न्यायालय २३ ऑगस्टला सुनावणी करणार असून त्यानंतर आरोप निश्चिती प्रक्रिया होईल.
या प्रकरणी मानवाधिकार हक्कांसाठी लढणाऱ्या सुधा भारद्वाज, वेर्णन गोन्साल्विस, वरवरा राव, हानी बाबू, प्रा. आनंद तेलतुंबडे, शोमा सेन, गौतम नवलखा यांच्यासह १५ जण अटकेत आहेत. त्यांच्याविरोधात एनआयएने आरोपांचा मसुदा सादर केला आहे. त्यात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) दहशतवादाच्या गंभीर आरोपांसह विविध कलमांअतर्गत आरोपांचा समावेश आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोरेगाव-भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींनी कथितरीत्या भारतातील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आणि देशातील दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नेमलं होतं असा ठपका आरोपपत्रात ठेवला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित एल्गार परिषद प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये एनआयएने दिल्लीच्या जेएनयू तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) च्या विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नेमलं होतं असे म्हटले आहे.
आरोपींनी भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकारविरोधात युद्ध पुकारण्याचा प्रयत्न केला आहे.आरोपींनी एम – 4 या अत्यंत आधुनिक हत्यारासाठी आणि त्याच्या 4 लाख गोळ्यांसाठी 8 कोटी रूपयांचा निधी उभारण्याचा प्रयत्न केला आहे.त्याचसोबत क्यूएलझेड 87 हे ऑटोमेटिक ग्रेनेट लाँचर, आणि जीएम 94 हे रशियन ग्रेनेड लाँचर मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न होता.दहशतवादी संघटनांच्या मदतीनं त्यांचा देशात विविध ठिकाणी विस्फोट घडवून हिंसाचार करण्याचा बेत होता.प्रक्षोभक भाषण, गाणी, पथनाट्य यांच्या माध्यमातून प्रतिबंधीत नक्षली साहित्य आरोपींकडनं समाजात पसरवलं जात होतं.
जेएनयूसह देशातील विविध विद्यापीठातून विद्यार्थ्यांची माथी भडकवून त्यांना देशविरोधी कारवायांत सामिल करून घेतलं जात होतं.सर्व आरोपींविरोधात आयपीसी नुसार कलम 120बी (कट रचणे), 115 (हिंसा माजवणे), 121, 121ए (देशाविरोधीत युद्ध पुकारणे), 124ए (देशद्रोह), 153ए (हत्यार बाळगणे), 505(1)बी (प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करणं), 34 (सर्वांचा एकच हेतू) तर UAPA (दहशतवाद प्रतिबंध कायद्यानुसार) कलम 13, 16, 17, 18, 18a, 18b, 20 (दहशतावदी कारवाया करणं) तर कलम 38, 39, 40 (दहशतवादा संघटनेत सहभाग) अश्या विविध आरोपांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुजारा किंवा रहाणेच्या जागी सुर्यकुमारला तिसऱ्या कसोटीत संधी द्यावी’,- फारुख इंजिनीयर
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- गंभीर! कोरोनाची तिसरी लाट; पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा’, निती आयोगाच्या सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
