Share

कौतुकास्पद! मराठमोळ्या दिपाली सय्यदकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत

Published On: 

मुंबई : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. प्रचंड पाऊस झाल्यानं अनेक शहरं आणि गावं पाण्याखाली गेली. कोकणातील अतिवृष्टीचा मोठा फटका रायगड जिल्ह्यालाही बसला. अनेक ठिकाणी दरडी कोसल्याच्या घटना घडल्या. अशा परिस्थितीत तेथील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकजण मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत.

अशातच मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिने 10 कोटींची मदत जाहीर केली आहे. शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या दिपाली सय्यद यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भोकरदन गावाला भेट दिली. येथील परिस्थिती पाहून त्यांचंही मन हेलावलं. आणि त्यांनी त्याच संवेदनशील भावनेतून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत जाहीर केली.

एकीकडे बॉलिवूड कलाकारांवर टीका होत असताना दिपाली यांनी जाहीर केलेली मदत ही बड्या अभिनेत्यांना, अभिनेत्रींना मोठी चपराकच म्हणावी लागेल. महाराष्ट्रावर एवढी गंभीर परिस्थिती ओढवून देखील बॉलीवूड मधून एकही कलाकार मदतीसाठी पुढे आला नाही. अशातच दिपाली सय्यद यांनी या कलाकारांसमोर एक आदर्श उभा केला आहे. दीपाली सय्यद यांच्या या पुढाकाराने सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!