रत्नागिरी: येथील चिपळूण दौऱ्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आहेत. या ठिकाणी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. आता पाहणी नाही तर मदत सुरु असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचीही उपस्थिती होती.
आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेवाभावी संस्था या सर्वांनी रेस्क्यूमध्ये खूप काम केले आहे.त्यामुळे आता पाहणी नाही तर मदतकार्याला सुरुवात झाली आहे. अजूनही काही जिल्ह्यात रेड अलर्ट आहे. पण आता पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासनाकडून मदत करण्यास सुरुवात झाली आहे. आम्ही शिवसेना म्हणून जी मदत करायची आहे ती करत आहोत. अन्य पक्षही मदत करत आहेत.असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
अगोदर तर सर्व नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यानंतर आरोग्य तपासणीवर जोर दिला जाणार आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदर आरोग्य तपासणीवर भर दिला जाणार आहे. आरोग्य तपासणी, घरगुती सामान, स्थलांतर आदी या सर्व गोष्टींवर शासन भर देत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पवना धरण ८५ टक्के भरले; विसर्ग सुरु होणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
- शिखर धवनने दुसर्या टी -20 सामन्यात कोहलीचा विक्रम मोडत घेतली अव्वल स्थानी झेप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

