Share

Gulabrao Patil : “संजय राऊतांना ३०२, तडीपार माहित नाही, हे बाळासाहेबांचा फोटो…” ; गुलाबराव पाटलांची टीका

Published On: 

🕒 1 min read

गुवाहाटी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून 30 जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. म्हणजेच उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र या बहूमत सिद्ध करण्याच्या विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. कोर्ट आज संध्याकाळी 5 वाजता यावर सुनावणी करेल. तर गुवाहाटीला असलेले सर्व बंडखोर आमदार कामख्या देवीचे दर्शन घेऊन गोव्याला निघणार आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. यापूर्वी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे.

गुवाहाटी येथील रेडिनस ब्लू हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांसोबत बोलताना गुलाबराव पाटील यांनी आपला अस्सल गावरान हिसका दाखवला. गुलाबराव पाटील म्हणाले, “आजवर अनेक सभा गाजवून शिवसेनेचा विचार सर्वदूर पोहचवला. एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून इथंपर्यंत आलो आहोत. आपल्यावर भरपूर टिका झालेल्या आहेत. कधी प्रेत काढू तर तुमचे बाप किती, आमच्या जिवनाचा संघर्श कोणाला माहित नाही. ३०२ काय असते हे संजय राऊत यांना माहित नाही आहे. तडीपार काय असतं हे देखील त्यांना माहित नाही. हे सगळे बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. संजय राऊत यांनी ४७ अंस सेल्सियस तापमानात जळगावमध्ये ३५ लग्न लावावे मी त्यांना बहाद्दर म्हणुन समजून घेईल.”

संजय राऊतांनी केला होता घणाघात

“बंडखोरांना अनेक बाप आहेत. आमचा एकच बाप बाळासाहेब ठाकरे आहेत. तिथून बसून ते सांगत आहेत की तिथलं वातावरण खूप चांगलं आहे. समोर डोंगर आहे वगैरे वगैरे… महाराष्ट्रात स्मशानभूमी आहे का? तिथे भाजपच्या पैशावर पार्टी करत आहेत. आता तुमच्या दिल्लीच्या बापाच्या नावाने मते मागा,” असे आव्हान संजय राऊत यांनी केले होते.

बरं झाली घाण गेली-

आदित्य ठाकरे यांनी देखील बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला होता. बरं झाली घाण गेली, असे आदित्य ठाकरे म्हणाले होचे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती? असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!