Share

मायकल वॉनने पुन्हा भारतीय संघाला कमी लेखले ; टीम इंडियाबाबत केली अशी भविष्यवाणी

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. या सामन्यात भारत आणि न्युझीलंड हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे आहेत. इंग्लंडमधील साउथहॅम्पटन येथे १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना होणार आहे.

भारतीय टीम पुढच्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. मात्र, न्यूझीलंडची टीम भारतीय टीमआधीच इंग्लंडमध्ये पोहोचली आहे. तर भारताला इंग्लंड दौऱ्यात सुरुवातीलाच 24 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

एवढे दिवस क्वारंटाईन कालावधीमध्ये घालवल्यामुळे टीम इंडियाला तयारीसाठी वेळ मिळणार नाही, त्यामुळे फायनलमध्ये न्यूझीलंड जिंकेल, अशी भविष्यवाणी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने केली आहे. ‘इंग्लंडमधलं वातावरण, ड्युक बॉल, भारताचा व्यस्त कार्यक्रम, हे सगळं बघता फायलनमध्ये न्यूझीलंडचा विजय होईल. भारत जेव्हा इंग्लंडमध्ये पोहोचेल, तेव्हा न्यूझीलंडच्या इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट खेळून झाल्या असतील. फायनल आधी किवी टीम या दोन टेस्टमध्ये तयारी करू शकेल. न्यूझीलंडची तयारी चांगली झाली असेल, तसंच लाल बॉलने क्रिकेट खेळलेले खेळाडू त्यांच्याकडे उपलब्ध असतील,’ असं मायकल वॉन म्हणाला.

याआधी मायकेल वॉने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भारतीय असता तर तो जगातील महान फलंदाज ठरला असता. असं वक्तव्य केलं होतं ‘माझ्या मते विल्यमसन तीन्ही प्रकारात सर्वोत्तम आहे. पण तो विराट कोहलीची बरोबरी करु शकत नाही. कारण, त्याचे इन्स्टाग्रामवर 100 मिलिअन फॉलोअर्स नाहीत, त्याच्याकडं मोठ्या कंपनीच्या जाहिराती नाहीत. त्यामुळे तो जास्त कमाई करत नाही. सर्व जण विराटबद्दल चांगलं बोलतात. त्यामुळे त्याचे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढतात. विल्यमसन ज्या पद्धतीनं खेळतो. मैदानावर त्याचं वर्तन शांत आणि संयमी असते. ही खरंच कमाल आहे.’ असं वॉननं टोमणा मारला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!