मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सोनू सूद पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे.
दरम्यान, सोनू सूदने चेन्नई सुपरकिंग्सचा क्रिकेटपटू कर्ण शर्माचं कौतुक केलं आहे. कर्ण शर्मा सोनू सूदच्या फाऊंडेशनला पाठिंबा देत आहे. सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कर्ण शर्माचं कौतुक केलं आहे. कर्ण शर्मा आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. ‘सोनू सूद फाऊंडेशनला मदत करण्यासाठी खूप आभार, माझ्या भावा. तू पुन्हा एकदा देशाच्या तरुणांना प्रेरित केलं आहे. तुझ्यासारख्या लोकांमुळेच हे जग सुंदर आणि शांततापूर्ण आहे,’ असं ट्वीट सोनू सूदने केलं.
Thank you so much brother @sharmakarn03 for your constant support to @SoodFoundation! You have inspired the youth of the nation once again and people like you truly make this world a beautiful and peaceful place. ????
— sonu sood (@SonuSood) May 18, 2021
You are a real hero of our Nation. Doing a great effort. Hats-off to you! Keep going brother. ????????????
— Karn Sharma (@sharmakarn03) May 18, 2021
सोनू सूदच्या या ट्वीटवर कर्ण शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे. तू देशाचा खरा हिरो आहेस, तू खूप चांगला प्रयत्न करत आहेस. तुला खूप शुभेच्छा, असंच काम करत राहा, भावा, अशी कमेंट कर्ण शर्माने केली. देश अशा कठीण परिस्थितीला सामोरे जात असताना बरेच जण मादीसाठी पुढे त्यामध्ये क्रिकेटपटूं व कलाकारांचा देखील समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- वृद्धिमान साहाच्या फिटनेसबाबत चिंता ; भारतीय संघासोबत आणखी एक यष्टीरक्षक जाणार इंग्लंडला
- ‘भारताला जिंकायचे असेल तर विलियम्सनला लवकर बाद करावे लागेल’‘
- ‘या’ तारखेला होणार भारतात आयोजीत टी-२० विश्वचषकाचा अंतिम निर्णय
- इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा दिलासा ; ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू कोरोनामुक्त
- आयपीएल पाठोपाठ कोरोनामुळे जुन महिन्यातील ‘ही’ स्पर्धाही रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

