मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याच संसर्गामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. यानंतर जागतीक क्रिकेटमधील महत्वाची आशीया कप ही स्पर्धाही कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे.
यादरम्यान बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात भारतीय संघाचा युवा अष्टपैलु वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर हा त्याच्या घरी आहे. मात्र त्याच्या वडिलांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण इंग्लंड दौऱ्याआधी वॉशिंग्टची मुंबई येथे कोरोना चाचणी होणार आहे. याआधी घरी असताना वॉशिंग्टनला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कारण वॉशिंग्टनचे वडील आठवड्यातून २-३ दिवस ऑफिसला जात असतात. यादरम्यान त्यांचा कोरोनाबाधीताशी संपर्क येण्यची शक्यता असते.
त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी त्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काही दिवस घर सोडुन वेगळ राहण्याचा निर्णय घेतला आहे. घरात वॉशिंग्टन सोबत त्याची आई आणि बहिण असते. तर वडिल हे व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधत असतात. इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्याआधी सर्व भारतीय खेळाडू हे मुंबईत एकत्र जमणार आहे. यावेळी प्रत्येक खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खूप आभार, माझ्या भावा’ ; सोनू सूदने केलं सीएसकेच्या खेळाडूचं कौतुक
- वृद्धिमान साहाच्या फिटनेसबाबत चिंता ; भारतीय संघासोबत आणखी एक यष्टीरक्षक जाणार इंग्लंडला
- ‘भारताला जिंकायचे असेल तर विलियम्सनला लवकर बाद करावे लागेल’‘
- ‘या’ तारखेला होणार भारतात आयोजीत टी-२० विश्वचषकाचा अंतिम निर्णय
- इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा दिलासा ; ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू कोरोनामुक्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

