Share

‘या’ तारखेला होणार भारतात आयोजीत टी-२० विश्वचषकाचा अंतिम निर्णय

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याच संसर्गामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. यानंतर जागतीक क्रिकेटमधील महत्वाची आशीया कप ही स्पर्धाही कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे.

यादरम्यान भारतात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबद्दलच्या हालचालीना वेग आला आहे. बीसीसीआयने येत्या २९ मे रोजी एक बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. अशी माहिती बीसीसीआयच्या एका सुत्राने दिली. या बैठकीत टी-२० विश्वचषकात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी भारतातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेसाठी ज्या शहरांचे नाव निवडले आहे, त्यांचा पुन्हा विचार केला जाईल.

तसेच १ जुन रोजी आयसीसीची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे बीसीसीआयची ही बैठक फार महत्वाची ठरणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन हे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने कोलकाता, लखनऊ, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांची निवड केली आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार असुन १३ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!