Share

वृद्धिमान साहाच्या फिटनेसबाबत चिंता ; भारतीय संघासोबत आणखी एक यष्टीरक्षक जाणार इंग्लंडला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुनदरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

मात्र, मालिकेपूर्वीच ‘टीम इंडिया’ची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. कारण इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेले वृद्धिमान साहा अजूनही अनफिट आहे. त्याच्या फिटनेस आणि आरोग्याबाबत चिंता असल्याने आता आंध्रचा यष्टीरक्षक-फलंदाज श्रीकर भरत भारतीय संघासोबत इंग्लंडला जाणार आहे.

आयपीएलच्या 14 व्या सत्रादरम्यान वृद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तो बराही झाला होता. मात्र, दुसऱ्या टेस्टमध्ये तो पुन्हा पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याचा क्वारंटाइन कालावधी वाढविण्यात आला होता. मंगळवारी तो कोरोनामुक्त झाला असला तरीदेखील निवड समिती कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार नसून भरत राखीव यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघासोबत इंग्लंडला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!