Share

‘भारताला जिंकायचे असेल तर विलियम्सनला लवकर बाद करावे लागेल’

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. या सामन्यात भारत आणि न्युझीलंड हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे आहेत. इंग्लंडमधील साउथहॅम्पटन येथे १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना होणार आहे.

या सामन्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे. न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर न्युझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने भारतीय संघाविषयी एक वक्तव्य केले आहे. विल्यमसन म्हणाला की,’जागतीक कसोटी चॅम्पीयनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचणे खुपच रोमांचक आहे. आणि इतक्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाविरुद्ध खेळणे खुपच आव्हानात्मक आहे. अंतिम सामन्यात पोहोचलो याचा आनंद आहेच, मात्र सामना जिंकलो तर अधिक आनंद होईल’ असं म्हंटला आहे.

दरम्यान, हा सामना जिंकायचा असेल तर प्रतिस्पर्धी कर्णधार केन विलियम्सनला लवकर बाद करावे लागेल,’ असे मत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केले आहे.’ केनच्या फलंदाजीत मोठ्या उणिवा नाहीत. कुठलाही बलाढ्य फलंदाज चांगल्या चेंडूवर बाद होऊ शकतो. आम्हाला केनच्या फलंदाजीबाबत जाणीव आहेच. वेगवान गोलंदाज या नात्याने मला संधी मिळाल्यास मी माझ्या बलस्थानांसह मारा करणार आहे. केनला लवकर बाद केल्यास संघाला लाभ होईल.’ असे उमेश म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!