Share

रणबीर सोबत हॉलिडेचे खास फोटो शेअर करत आलिया म्हणाली ‘हकुना मटाटा’

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ही जोडी लोकप्रिय असून चांगलीच चर्चेत आहे. तसेच आलिया भट्ट ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतच तिने बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून तिच्या हॉलिडेचे काही खास फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये नॅशनल पार्कमध्ये दोघेही एकत्र नवीन वर्ष साजरे करत आहेत. व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. आलिया भट्टने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सिंह आणि वन्य प्राण्यांचेही फोटो आहेत, ज्यामुळे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी ते नॅशनल पार्कमध्ये पोहोचल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या वर्षीही आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये (Ranthambore National Park) पोहोचले होते. जिथे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण देखील त्याच्यासोबत सामील झाले होते.

https://www.instagram.com/aliaabhatt/p/CYJm3SXMXpG/?utm_medium=copy_link

सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना आलिया भट्टने एक मजेशीर कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले ‘२०२२ ला काही हकुना मटाटा (Hakuna matata), सुरक्षित रहा…हसत रहा..साधे रहा आणि अधिक प्रेम करा’, असे कॅप्शन दिले असून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांचे नाते अधिकृत केले होते. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!