रत्नागिरी : आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहे.
मुंबई मेट्रो-3च्या कांजूरमार्गमधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. एमएमआरडीएला देखील तातडीनं काम थांबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
यानंतर महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांनी आगपाखड केली आहे. फडणवीस सरकार काळात आरे येथील कारशेडच काम सुरु करण्यात आलं होतं. मात्र या कामास स्थानिकांसह पर्यावरण प्रेमींचा विरोध होता. हा वाढत विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, कांजूरमार्ग येथील जमिनीचा वाद पेटला आहे.
आता, भाजप नेते निलेश राणे यांनी रखडलेल्या विकासकामांवरून व मेट्रोच्या कामाला होणाऱ्या विलंबावरून ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मुंबई मेट्रो कारशेड प्रकल्प ठाकरे सरकारच्या इगो मुळे रखडला जातोय. उच्च न्यायालयाने आज ठाकरे सरकारला मोठा झटका देत प्रकल्पाला स्थगिती दिली. करोडो रुपयांची वाट लावत ठाकरे सरकारने लोकांच्या पैशाचा चुराडा केला. या सरकारला अजून अक्कल येत नाही आणि येईल अशी खात्री सुद्धा नाही.’ अशी टीका राणेंनी केली आहे.
मुंबई मेट्रो कारशेड प्रकल्प ठाकरे सरकारच्या इगो मुळे रखडला जातोय. उच्च न्यायालयाने आज ठाकरे सरकारला मोठा झटका देत प्रकल्पाला स्थगिती दिली. करोडो रुपयांची वाट लावत ठाकरे सरकारने लोकांच्या पैशाचा चुराडा केला. या सरकारला अजून अक्कल येत नाही आणि येईल अशी खात्री सुद्धा नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 16, 2020
महत्वाच्या बातम्या
- शाब्दिक कोट्या करून टाळ्या मिळवणं इतकंच ठाकरेंच्या भाषणाचं सार – भाजप
- सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यात हे सरकार कुचकामी ठरलं : उपाध्ये
- कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करणारी महाराष्ट्रातील ‘ही’ ग्रामपंचायत ठरली देशातील पहिली ग्रामपंचायत
- ‘या’ योजनेतील लाभार्थींना उत्पन्नाचा दाखला सादर करण्यापासून सूट; धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय
- ‘उद्धव ठाकरे डरपोक, हिंमत नसलेले पहिले मुख्यमंत्री’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

