🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली असतानाच ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी आरक्षण बचावाची भूमिका घेत ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज आरक्षण अबाधित राहावं व मेगा भरती लवकर घेण्यात यावी अशा मुद्द्यांसाठी रस्त्यावर उतरला होता.
दरम्यान, ओबीसी आरक्षण कायम राहावे याबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्यभरातील आंदोलनांची दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीसह कुठल्याही आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही अशी मुख्यमंत्री उद्धवज ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनात भूमिका स्पष्ट केली आहे.
त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि विरोधी पक्षाचे आभार मानण्यात येत असून समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढील नियोजित मोर्चे रद्द करण्याची भूमिका समता परिषदेने घेतली आहे. यासोबतच, मोर्चे रद्द करून केवळ ओबीसी आरक्षणासाठी शासनाने निष्णात वकील देणे आणि महाज्योती,शिष्यवृत्तीसह इतर मागण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाबाबत काही याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत भूमिका घेतली होती. त्यामुळे या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये याबाबत राज्यभर रस्त्यावरचे मोर्चे व आंदोलने करून आपली भूमिका शासनाकडे मांडली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षाने मराठा आरक्षण देताना ओबीसींसह कुठल्याही आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. या निर्णयाचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात येत असून राज्य शासनाचे आभार मानले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पक्ष वाढवायचा असेल तर राज ठाकरेंनी फिरलं पाहिजे; चंद्रकांतदादांचा सल्ला
- शेतकरी आंदोलनाच्या आडून वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलचा खोटा प्रचार; जिओचा गंभीर आरोप
- ‘या सरकारला अजून अक्कल येत नाही आणि येईल अशी खात्री सुद्धा नाही’
- अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय माणूस आजपर्यंत पाहिला नाही- विनायक मेटे
- देशभरातल्या विविध राज्यात कृषी कायद्यांचे स्वागत होत आहे; केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
