पुणे : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते.
दरम्यान आज हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. महत्वाचं म्हणजे रत्नागिरी आणि रायगडला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे याठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे चिपळूणमध्ये गेली १७ तास मुसळधार पाऊस कोसळत असून पुन्हा एकदा महापुराची भीती असल्याने आधीच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात, पुढचे 2 ते 3 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे.
तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात देखील पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. शहरासह ग्रामीण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार एक दोन तास बॅटिंग सुरु असून काही तालुक्यात संततधार पाऊस येत आहे. संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. शहर परिसरातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्यातील १७ शाळा होणार ‘आदर्श’; राज्यशासनाचा निर्णय!
- घरावर दगड मारायला पाचशे-पाचशे लोक आले, त्यावर बंदी नाही घातली; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- मराठवाड्यात नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण करणार; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराडांचे आश्वासन!
- ‘गर्दीचा नियम फक्त विरोधकांना नव्हे, सत्ताधाऱ्यांनाही लागू करा’, आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- सोशल मिडियावर शेअर होतात सेलिब्रिटींचे डोहाळे अन गुडन्यूज सांगण्याची वेगळी अदा


