औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील १७ शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा विकसित केल्या जाणार आहेत. अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. या शाळांमध्ये शौचालये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी – सायन्स लॅब, ग्रंथालय यासारख्या सुविधांचा समावेश असेल.
शैक्षणिक गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक साहित्य, पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी शिक्षकांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे. शाळेच्या ग्रंथालयामध्ये पूरक वाचनाची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ, एन्सायक्लोपिडिया उपलब्ध करण्यात येणार आहे. स्वअध्ययनासोबतच गट अध्ययनास रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
तसेच विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास होईल याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाणार आहे. नवनिर्मितीला चालना देणारे, समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती – संविधानिक मूल्ये अंगी बाणवणारे, सोबत काम करण्याचे कौशल्य तसेच संभाषण कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे प्रयत्न केला जाणार आहेत. ४८८ शाळांच्या विकासासाठी ४९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिली मराठी माध्यमाच्या एकात्मिक पाठ्यपुस्तकाची पथदर्शी स्वरूपात अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- गणेशोत्सवात मंडळांनी अधिकृत वीज घ्या ; घरगुती दराने वीज देऊ- ऊर्जामंत्री नितीन राऊत
- घरावर दगड मारायला पाचशे-पाचशे लोक आले, त्यावर बंदी नाही घातली; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- मराठवाड्यात नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण करणार; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराडांचे आश्वासन!
- ‘गर्दीचा नियम फक्त विरोधकांना नव्हे, सत्ताधाऱ्यांनाही लागू करा’, आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- सोशल मिडियावर शेअर होतात सेलिब्रिटींचे डोहाळे अन गुडन्यूज सांगण्याची वेगळी अदा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

