मुंबई : कोरोना संसर्गात थोडीशी वाढ होताना दिसत आहे, अशा परिस्थितीत मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे स्थगित करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अन्य कार्यक्रम नियमांचे काटेकोरपालन करून साजरे करण्यास हरकत नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या आवाहनाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे. तसेच गर्दीचा नियम फक्त विरोधकांना नव्हे, सत्ताधाऱ्यांनाही लागू करा असे म्हणत टोलाही लगावला आहे.
रामदास आठवले म्हणाले की, ‘उत्सवापेक्षा लोकांचे जीव वाचविणे महत्वाचे असल्याने गर्दी करू नका असे मुख्यमंत्र्यांनी केलेले आवाहन योग्य आहे. मात्र गर्दी करू नये हा नियम फक्त विरोधी पक्षाला लागू करू नका तर सत्ताधारी पक्षांनाही लागू करा. तसेच जेथे आवश्यकता नाही तेथे मात्र निर्बंध लादू नका अशी माझी सूचना आहे.’
उत्सवापेक्षा लोकांचे जीव वाचविणे महत्वाचे असल्याने गर्दी करू नका असे मुख्यमंत्र्यांनी केलेले आवाहन योग्य आहे. मात्र गर्दी करू नये हा नियम फक्त विरोधी पक्षाला लागू करू नका तर सत्ताधारी पक्षांनाही लागू करा. तसेच जेथे आवश्यकता नाही तेथे मात्र निर्बंध लादू नका अशी माझी सूचना आहे. pic.twitter.com/Q4xFD9yZLr
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 7, 2021
दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना एक आवाहन केलं आहे. राजकीय पक्ष आणि संघटनांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत अन्य कार्यक्रमही नियमात राहून साजरे करावेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. यापुढे हजारोंच्या संख्येने लोक जमतील अशा ठिकाणी सहसा मी जाणार नाही असं पवारांनी जाहीर केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फक्त मंदीरेच कोरोना पसरवतात असं वाटत का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
- मुंबई : फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य
- कपाटातून चोरीला गेलेले ७ कोटी कुठून आले होते? हेही पवारांनी गवळींना विचारावं – सोमय्या
- ‘त्या’ काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून पेढे वाटताना शिवसेनेला लाज वाटली नाही का?
- भाजपचे दोन फायरब्रँड नेते पवारांच्या बारामतीत येवून डागणार तोफ


