दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कोकणातील बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाच्या उदघाटनाची घोषणा करण्यासह विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सणांसह मंदिरे बंद ठेवण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.
‘फक्त हिंदूंचा सण-उत्सवांवर बंदी का ? माझ्या घरावर पाचशे-पाचशे लोक दगडफेक करायला आले, त्याला बंदी का नाही घातली ? त्यांच्यामुळे कोरोना होत नाही का ? उलट मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. हे कोणत्या विचारसरणीचे मुख्यमंत्री ? असे सवाल करत राणे यांनी ठाकरेंना लक्ष्य करतानाच यांना भीती दाखवून घरात बसायचं आहे,’ असा खोचक टोला देखील लगावला आहे.
आरोग्य केंद्र बंद करून मंदिरं उघडू का? – ठाकरे
‘आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळं उघडली पाहीजेत, हरकत नाही. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, कि त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू. आरोग्य केंद्र बंद करून. आज आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत,’ असं देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
- फक्त मंदीरेच कोरोना पसरवतात असं वाटत का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
- नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार; विष्णुपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे खुले, चव्हाणांची महत्वाची सूचना
- कपाटातून चोरीला गेलेले ७ कोटी कुठून आले होते? हेही पवारांनी गवळींना विचारावं – सोमय्या
- ‘त्या’ काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून पेढे वाटताना शिवसेनेला लाज वाटली नाही का?
- ‘गर्दीचा नियम फक्त विरोधकांना नव्हे, सत्ताधाऱ्यांनाही लागू करा’, आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना टोला


