Share

औरंगाबादेत ‘मेसा’च्या मागण्यांना यश; लढा सुरुच राहणार असल्याचे प्रतिपादन..!

Published On: 

औरंगाबाद: महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन( मेसा ) संघटनेचे स्थानिक पातळीवरील  प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होते. यासाठी मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे हस्तेकर सरचिटणीस प्राविण आव्हाळे , उपाध्यक्ष नागेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली विविध मार्गाने उपोषणे, निदर्शने, आंदोलने करण्यात आली होती. शिक्षणाधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेवून मेसा संघटनेस चर्चेसाठी लेखी पत्र दिले. त्यांच्या मागण्यांना मंजुरी दिल्याने मेसा संघटनेकडून आनंद व्यक्त केला जात आहे. परंतु मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उपशिक्षणाधकारी प्रियाराणी पाटील, सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत इंग्रजी शाळांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष रत्नाकर फाळके यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष प्रल्हाद शिंदे , नागेश जोशी , हनुमान भोंडवे , विश्वासराव दाभाडे, पठारे, मनिषा जोशी, सविता पवार, सांगोले, शिवराम म्हस्के यांनी विविध पुरावे व न्यायालयीन दाखले देवून अनेक प्रश्न उपस्थित केले. चर्चेअंती सर्व मागण्या मंजूर  करण्यात आल्या. यावेळी प्रलंबित प्रथम शाळा मान्यता, नैसर्गिक वर्ग वाढ, आरटीई प्रमाणपत्र, आठ दिवसात देण्यात येईल.

तसेच आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम एक महिन्याच्या आत मेरीटप्रमाणे शाळांना वितरीत करण्यात येईल. थकित प्रतिपूर्ती रक्कमेसाठी तातडीने शासनाकडे मागणी केलेली आहे. शाळेचा संबध नसलेल्या व लाभापोटी शाळेला वेठीस धरणाऱ्या  व्यक्तिंची पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणे, ऑनलाईन प्रवेश असल्याने प्रतिपूर्ती विनाअट ऑनलाईन मिळावी, शाळेची फीस न भरणाऱ्या पालकांच्या पाल्याबाबत फिस ऍक्टनुसार कारवाई करणे, प्रतिवर्षी वर्षातून दोन वेळा सहविचार सभा घेणे आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.  यावेळी प्रत्येक तालुक्यातील मेसा इंग्रजी शाळा संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!