Share

राष्ट्रीय लोक समता पार्टीचा नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये विलीनीकरण

Published On: 

पटणा : बिहारमधील राजकारणात मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विरोधकांची कमी नाही. हे विरोधकही वेळोवेळी बदलत आहेत. लालू प्रसाद यादव, जे एका टप्प्यावर त्यांचे सहयोगी होते, ते आज त्यांचे मोठे विरोधक आहेत. सध्या लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान आणि नितीश कुमार यांचा राजकीय विरोध शिगेला पोहचला आहे, परंतु राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा, जे काही काळापूर्वीपर्यंत शत्रू होते आता त्यांना नितीश कुमार यांनी मिठी मारली आहे.

बिहारमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडून आली आहे. उपेंद्र कुशवाहा यांनी आज आपला पक्ष राष्ट्रीय लोक समता पार्टी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये विलय करुन टाकला आहे. कुशवाहा यांनी आज पटणामध्ये आयोजित केलेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये या विलयाची घोषणा केली. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होतीच.

या एकत्रीकरणाची घोषणा करताना उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं की, हा देश आणि राज्याच्या हिताचा निर्णय आहे. राज्य आणि देशाच्या हितासाठी समविचारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. ही सध्याच्या राजकारणाची गरज आहे. त्यामुळेच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लोक समता पार्टीने जेडीयूसोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता त्यांच्यासोबत आहोत.’ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

प्रेस कॉन्फरन्समध्ये उपेंद्र कुशवाहा म्हणाले की, ‘नितीश माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मी वैयक्तिकरित्या नेहमीच त्यांचा सन्मान केला आहे. आणि आता आम्ही असा निर्णय घेतलाय की, राष्ट्रीय लोक समता पार्टीचा सगळा चमू आता मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वामध्ये काम करेल. देश आणि राज्याच्या परिस्थितीला लक्षात घेता हा निर्णय घेतला गेला आहे. आता आम्ही जेडीयूसोबत असू आणि काम करु.’ असे कुशवाहा यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!