पुणे – देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. करोना रुग्ण वाढत असल्यामुळे बऱ्याच शहरांमध्ये मर्यादित प्रमाणात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे.
एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे राज्य सरकार पुन्हा टाळेबंदी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. राज्यसरकारच्या धरसोड वृत्तीमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक मोठे अस्वस्थ झाले असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकानांना बंदीचे आदेश दिले आहेत.
या निर्बंधांमुळे पुण्यातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून सरकारच्या नियमांविरोधात जाऊन दुकाने उघडण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला होता. मात्र आता व्यापारी महासंघाने थोडी मवाळ भूमिका घेत आपले आंदोलन स्थगित केले आहे. तसेच पूर्ण लॉकडाउन केला तरच सरकारला पाठिंबा देणार मात्र मिनी लॉकडाऊन जर कायम ठेवलातर वेगळा निर्णय घेणार असल्याचेपुणे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचं रांका यांनी यावेळी सांगितले
या पार्श्वभूमीवर काही निवडणूक व्यापारी संघटेनच्या सभासदांना काल पुण्याचे विभागीय आयक्त सौरभ राव यांनी चर्चेसाठी बोलावलं होतं. यावेळी व्यापाऱ्यांनी आपली व्यथा मांडली.दरम्यान, शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ग्राहक हे व्यापाऱ्यांचे दैवत आहे. ग्राहक आणि व्यापारी बाधित झाल्यास त्याचा परिणाम होईल. पुणे करोनामुक्त करण्यास आमचा पाठिंबा आहे. मात्र, कारखाने, उद्योगधंदे, खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या, ई-कॉमर्स सुरू ठेवण्याची भूमिका योग्य नाही, असेही रांका यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊन करावा त्याला आमचा पाठींबा आहे.त्या लॉकडाऊनला पुण्यातील व्यापारी वर्गाचा त्याला पाठिंबा देतील. मात्र, जर संपूर्ण लॉक डाऊनचा निर्णय घेतला नाहीतर मात्र गुरुवारपासून आम्ही दुकाने उघडणार असा इशारा देखील रांका यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नंदुरबारमध्ये बिकट परिस्थिती, बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण गुजरातच्या वाटेवर
- कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की
- पहिल्याच सामन्यात युनिवर्सल बॉस गेलचा विक्रम; आयपीएलमधील पहिलाच खेळाडू
- रेमडेसिविर इंजेक्शन 25 हजार रुपयांना विकताना डॉक्टरला केली पोलिसांनी अटक
- संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाहीतर आम्हीही दुकाने उघडणार,व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

