Share

देशव्यापी लॉकडाऊन लावल्यास कोरोनाची साखळी तुटेल – टास्क फोर्स

Published On: 

नवी दिल्ली : एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात लॉकडाऊन करण्याच्या चर्चांना उधान आले आहे. देशात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. कालच देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही ताण येत आहे. दरम्यान, केंद्र सरकारला कोरोना व्यवस्थापनावर सल्ला देणाऱ्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे.

आपण या परिस्थितीकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहत आहोत. आरोग्य व्यवस्थेची वाढ करण्यासाठी उत्तम करण्यासाठी एक मर्यादा असते. आपण ऑक्सिजनचा पुरवठा सुधारला आहे. परंतु रुग्णांची वाढती संख्या पाहता आताही ऑक्सिजनची कमतरता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव एकातून दुसऱ्या व्यक्तीत होते. अशा लॉकडाऊन करून संक्रमणाची साखळी तोडणं हा योग्य रस्ता आहे. देशव्यापी लॉकडाऊन लावल्यास कोरोनाची साखळी तुटेल आणि रुग्णांच्या संख्येत होणारी मोठी वाढही कमी होईल, असं सदस्य़ांनी म्हटलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी तज्ज्ञांसोबत महत्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये ते देशात गंभीर रुप घेतलेल्या कोरोनाला कसे रोखायचे, संकटाची व्याप्ती, देशभरातील ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा, रेमडेसीवीर तुटवडा आदींबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. तसेच देशातील कोरोना योद्ध्यांच्या म्हणजेच मनुष्यबळावर देखील चर्चा करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!