नवी दिल्ली : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. दुसरीकडे देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या त्यामुळे देशात संसर्गाचा धोका वाढला आहे.
आज सकाळपासून राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोठं विधान केलं आहे. कोणीही जिंको, काही फरक पडत नाही. आज लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
On today’s election results :
Whoever wins such victories are pyrrhic
Today what matters is :
Saving lives
— Kapil Sibal (@KapilSibal) May 2, 2021
कपिल सिब्बल यांनी ट्विट करून हे विधान केलं आहे. आज लोकांचा जीव वाचवण्याखेरीज दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. आज निकाला दिवस आहे. कोणीही जिंको. पण देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फरक पडत नाही. आज लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे. असे ट्वीट त्यांनी केले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी तज्ज्ञांसोबत महत्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये ते देशात गंभीर रुप घेतलेल्या कोरोनाला कसे रोखायचे, संकटाची व्याप्ती, देशभरातील ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा, रेमडेसीवीर तुटवडा आदींबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. तसेच देशातील कोरोना योद्ध्यांच्या म्हणजेच मनुष्यबळावर देखील चर्चा करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- फक्त ‘या’ दोन राज्यांमध्ये सत्ताबदल होईल; संजय राऊत यांचा ‘पोल’ खरा ठरणार ?
- फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाच जणांविरोधात तक्रार दाखल !
- दिलासा: आता प्राप्तिकर भरण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत
- ‘पुनावालांच्या आरोपांवर खरं-खोटं तपासण्याची गरज’, जितेंद्र आव्हाडांची मागणी
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

