नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१९-२० चे ‘रिव्हाइज्ड इन्कम टॅक्स रिटर्न’ (आयटीआर) दाखल करण्यासाठी आता ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या काळात करदात्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. प्राप्तिकर विभागाने अशा अनेक कामांच्या मुदतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संबंधी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वतीने आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार वर्ष २०२०-२१ (आर्थिक वर्ष २०१९-२०) साठी प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम १३९ च्या ४ आणि ५ अंतर्गत बीलेटेड किंवा रिव्हाइज्ड रिटर्न दाखल करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढवण्यात आली आहे. या आधी ३१ मार्च २०२१ पर्यंत ही मुदत देण्यात आली होती.
✅Govt extends timelines of certain compliances, to mitigate the difficulties faced by taxpayers due to ongoing COVID-19 pandemic
✅CBDT Circular No.8/2021 in F. No. 225/49/2021/ITA-II dated 30.04.2021 is available on https://t.co/kJSWZCHCYU.Read more➡️ https://t.co/bTKV4GuMuF pic.twitter.com/zlx0yTQ4Sh
— Ministry of Finance (@FinMinIndia) May 1, 2021
आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर दाखल करण्यासाठी ३१ जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या दिनांकापर्यंत प्राप्तिकर भरल्यास करदात्याला अतिरीक्त शुल्क भरावे लागणार नाही. त्या नंतर मात्र, अतिरीक्त शुल्कासह प्राप्तिकर भरावा लागेल, असेही प्राप्तिकर विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विनाकारण फिरणाऱ्या ८१ नागरिकांपैकी ४ निघाले ‘कोरोना स्प्रेडर’!
- औरंगाबादेत जागृत हनुमान संस्थानचा सकारात्मक पुढाकार, कोरोना रुग्णांसाठी उघडले मोफत कोविड सेंटर!
- लसी येताच पैठणच्या कोरोना लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी, फिजिकल डिस्टन्सिंगचा पुर्ता बोजवारा !
- केंद्रसरकारवर वारंवार टीका करत बसण्यापेक्षा राज्यसरकारने लस का बुक केली नाही? – आ. लोणीकर
- आजपासून १८ प्लससाठी पाच केंद्रावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरण


