Share

औरंगाबादेत सर्व प्रतिबंधात्मक आदेशांना १५ मेपर्यंत मुदतवाढ, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Published On: 

औरंगाबाद :  जिल्ह्यात ब्रेक द चेनअंतर्गत देण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश तसेच स्पष्टीकरणांना शनिवार (दि. १) सकाळी ७ वाजेपासून ते दिनांक १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या बाबत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून शनिवारी मुदतवाढ दिल्याचे आदेश दिले आहेत.

१६ एप्रिल रोजीच्या मूळ आदेशामधीलल सर्व बाबी कायम राहणार असल्याचे देखील या आदेशामध्ये देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामधून हा सुधारीत आदेश देण्यात आला आहे. या  आदेशातील नमूद सर्व बाबी  संपूर्ण शहरासह  जिल्हयासाठी लागू करण्यात आला आहे. दरम्यान मुस्लीम बांधवांचा रमजानचा पवित्र महिना लक्षात घेऊन दुध तसेच फळे विक्री संबधी दुकाने पहिल्या टप्प्यात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास दिलेली विशेष परवानगी यापुढेही १३ मेपर्यंत अंमलात राहणार असल्याचा उल्लेख या आदेशात करण्यात आला आहे.

या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, तसेच साथरोग कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहणार असल्याचेही या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!