Share

फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाच जणांविरोधात तक्रार दाखल !

Published On: 

नाशिक : शुक्रवारी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. दरम्यान, आता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे ५ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाशिक रोड भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहंकडे, राहुल जोशी आणि बंटी ठाकरे या पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी फेसबुक अकाऊंटवरून आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते व आमदार गिरीश महाजन यांच्याबाबत देखील अत्यंत खालच्या भाषेत टिपण्णी केली आहे. शब्दांत संकेत भोसले याने गिरीश महाजन यांना उद्देशून फेसबुक अकाऊंटवरून धमकी देणारा व्हिडीओ प्रसारित केला होता. सोबतच यात देवेंद्र फडणवीस यांनाही मारण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या पदाधिका-यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे याबाबत तक्रार दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!