Share

काँग्रेस कमिटीचे सदस्य थेट पोहोचले कोविड सेंटरमध्ये आणि..

Published On: 

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मागील चार दिवसांत किलेअर्क येथील पालिकेचे कोविड केअर सेंटर हाऊसफुल झाले आहे. याठिकाणी शुक्रवारी कंत्राटदाराकडून जेवण पुरविण्यास प्रचंड विलंब झाला. यावेळी सर्व पॉझिटिव्ह रुग्ण थेट रस्त्यावर आले. दरम्यान पालिकेच्या कर्मचार्‍यांनी सर्व रुग्णांची समजूत घालत त्यांना शांत केले. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.२७) काँग्रेस कमिटीच्या सदस्यांनी किलेअर्क कोविड सेंटरला भेट देत दाखल झालेल्या रूग्णांची भेट घेतली. तसेच त्यांना खाद्यपदार्थ व पाणी वाटप करण्यात आले.

औरंगाबाद काँग्रसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद हिशम उस्मानी यांनी काँग्रेसच्या टीमसमवेत केंद्राला भेट दिली व तेथील डॉक्टर व कर्मचार्‍यांकडून झालेल्या घटनेची माहिती घेतली. तेथे दाखल असलेल्या रूग्णांना होणाऱ्या अडचणींबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून दोषींच्या कारभाराची चौकशीची करुन त्वरित कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री तथा औरंगाबादचे संपर्क मंत्री अमित देशमुख यांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनीही घटनेबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली. यावेळी रुग्णांनी कोरोना सेंटर मधील विविध समस्या काँग्रेस समोर मांडल्या. यात मुख्यत्वे पाण्याची कमतरता, जेवण वेळेवर भेटत नाही, साफसफाई योग्य होत नाही व इतर समस्या सांगितल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!