Share

मेल्ट्रॉन कोविड सेंटरला एक वर्ष पूर्ण, आतापर्यंत ७ हजार रुग्णांवर उपचार!

Published On: 

औरंगाबाद : गेल्या वर्षभरात कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेच्या मेल्ट्रॉन केअर सेंटर मधील रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या कोरोना योध्दा डॉक्टरांना तसेच रुग्णांना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते मंगळवारी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेच्या चिकलठाणा एमआयडीसी येथील महानगरपालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरला आज एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने रुग्णालयाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी येथील जास्तीत जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले. याबाबत आनंद व्यक्त केला.

या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय हे होते. यावेळी या रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा केली. त्यांना बरे करून त्याच्या घरी पाठवले. त्या काळात रुग्णसेवा करताना काय अनुभव आले याबद्दल डॉक्टरांनी आणि बरे झालेल्या रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले. याठिकाणी आत्तापर्यंत ७ हजार ४०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ६५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. उर्वरित रुग्ण पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकही रुग्ण दगावला नाही.

यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, महानगरपालिकेच्या या मेल्ट्रॉन रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी चांगल्या सोयी सुविधा औषधोपचार, जेवणाची उत्तम सोय , डॉक्टरांची चांगली टीम आहे. या डॉक्टरांनी रुग्णांना चांगली सेवा दिली. येथील प्रत्येक रुग्ण बरा होऊन घरी गेला ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. हे रुग्णालय साथ रोगासाठी पुढेही चालू राहील. कदाचित संभाव्य तिसरी लाट आली तर मेल्ट्रोन रुग्णालय सज्ज असून सर्व चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या कार्यक्रमाला शहर अभियंता एस .डी.पानझडे, सीईओ नंदकिशोर भोंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडलेचा, डॉ. नीता पाडळकर, उपायुक्त अपर्णा थेटे, वैशाली मुदगडकर आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!