Share

निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय, न्यायालयात जाण्याचा पंकजा मुंडे यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असल्याचे मत भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला देखील या संदर्भात भूमीका घेण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तशी मागणी केली. त्यांनी लिहिले की, ‘धुळे, नंदुरबार सह राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका लागल्याचे समजले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे.’

मराठा आरक्षणाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीमधील आरक्षणही रद्द झाले आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळेच आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. राज्य सरकार मधील ओबीसी मंत्री देखील या संदर्भात भूमीका घेण्याची मागणी करत होते. राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होवू देणार नसल्याचे या मंत्र्यांनी म्हटले होते. मात्र, निवडणुकींची घोषणा झाल्यामुळे आता या मंत्र्यांवर टीका होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!