🕒 1 min read
मुंबई : मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकाराबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. श्वास घेताना दम लागत असल्यामुळे या तरुणाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा तरुण अतिदक्षता विभागात बेशुद्धावस्थेत असताना हा प्रकार घडला आहे. तळमजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात या रुग्णावर उपचार सुरू आहेत.
रुग्णाची प्रकृती आधीच नाजूक आहे तसेच तो बेशुद्धावस्थेत आहे. असे असतानाच रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. श्रीनिवास याच्या डोळ्यांतून रक्त येत असल्याचे नातेवाईकांना दिसले. उंदराने त्याचे डोळे कुरतडल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे तेथील नर्सला त्यांनी याबाबत सांगितले मात्र, संबंधित नर्सकडून उलट उत्तरे मिळाली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Maharashtra | A patient was bitten by rats near his eye when he was in unconscious state in ICU ward of Mumbai municipal corporation's Rajawadi Hospital
Patient's condition is not good. This shouldn't have happened. We will take necessary action: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/8ZuF1b5j2s
— ANI (@ANI) June 22, 2021
दरम्यान, ज्या आयसीयू रूममध्ये ही घटना घडली त्या तळमजल्यावर उंदरांचा वावर आहे. श्रीनिवास यांना उंदराने चावा घेतला असल्याचे दिसते आहे. याबाबत सुरक्षेचे उपाय करीत आहोत, असे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
- ‘सरकारच्या पाठपुराव्या अभावीच ओबीसी आरक्षण रद्द’, खा. भागवत कराड यांचा आरोप
- ‘काही लोक पुनर्विचार याचिकेबाबत ट्विटर वरून माहिती देतायत, हे काय गौडबंगाल ?’
- दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराखाली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
