Share

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी २९ जूनला आयटकचा मोर्चा!

Published On: 

गंगापूर : महाराष्ट्रात सर्व शासकीय व्यवहार मराठीत व्हावेत असे आदेश असतानाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इंग्रजीतील पोषण ट्रॅकर अॅप वापरण्याची सक्ती आहे. हे अॅप मराठीतून देण्यात यावे, मासिक अहवाल आॅनलाईन भरण्याची कामे अंगणवाडी सेविकाना सांगू नयेत, थकीत प्रवास भत्ता बीलाचे पैसे त्वरित द्यावे आदी मागण्यांचे निवेदन गंगापूरचे बालविकास प्रकल्प अधिकारी कोरे व राठोड यांना देण्यात आले. २९ जून रोजी गंगापूरच्या दोन्हीही बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आयटकच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

बहुसंख्य अंगणवाडी कर्मचारी, विशेषतः ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील सेविका, मिनी अंगणवाडी सेविका कमी शिकलेल्या आहेत व त्यांना इंग्रजीमध्ये माहिती भरता येत नाही. काही ठिकाणी सेविकेची जागा रिक्त असल्याने मदतनीसांना ही जबाबदारी दिली आहे. त्यांना इंग्रजी येत नाही. पोषण ट्रॅकर अँपमध्ये मराठी भाषेला स्थान दिले गेले नसल्याने कामकाजात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे आयटक प्रणित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.

अनेक कर्मचाऱ्यांचा शासनाने दिलेला मोबाईल नादुरुस्त आहे व त्यात हा अॅप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या खाजगी मोबाईलवर अॅप डाऊनलोड करायला सांगितले जात आहे. अनेक सेविकांकडे स्वतःचा चांगला स्मार्ट फोन नाही. काहींकडे असल्यास तो त्या एकट्या वापरत नाहीत तर त्यांच्या घरातील कुटुंबीय सामायिकरित्या वापरतात. अनेकांच्या पाल्यांचे त्यावर ऑनलाईन वर्ग किंवा परिक्षा चालू असतात.

त्यामुळे त्यांना तो हवा तेव्हा उपलब्ध होत नाही. यासह अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्याचा चुकीचा निर्णय शासनासने मागे घ्यावा, अंगणवाडी सेविका, मदतनीसांची रिक्त पदे तात्काळ भरा, २ वर्षांची थकीत प्रवास भत्ता देयके तात्काळ द्यावीत. यांसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. वरील सर्व अडचणी सुटेपर्यंत व त्यात महत्वाचे पोषण ट्रॅकर जोपर्यंत मराठीत होत नाही तोपर्यंत अंगणवाडी कर्मचारी बाकी सर्व कर्तव्ये पार पाडतील परंतु, पोषण ट्रॅकर मध्ये माहिती भरण्याचे काम करणार नाहीत या मागण्या घेऊन सोमवारी गंगापूर बालविकास प्रकल्पाच्या दोन्हीही अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!