🕒 1 min read
लातूर : लातूर ग्राणीम मतदार संघात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतानाच आमदार धीरज देशमुख यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या. रस्त्याच्या कामात दर्जा राखण्याच्या सूचना देतांनाच वेळेत काम होत नसेल तर कंत्राटदार बदला. नव्याने निविदा काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
या आढावा बैठकीत राष्ट्रीय महामार्ग, पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे रस्ते व पुलांचा दर्जा आणि सुधारणा यासंदर्भात आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर-कळंब रस्त्यासह वाहतुकीला अडथळे ठरणारे इतर रस्ते, पूल यांची तत्काळ दुरुस्ती करा, नादुरुस्त व काम सुरु असलेल्या रस्त्यांमुळे प्रवासी, शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही आमदार देशमुख यांनी केल्या आहेत.
कामात दर्जा राखून वेळेत सर्व कामे पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पानगाव रस्त्याचे काम वेळेवर होत नसेल तर ते नव्या कंत्राटदाराला देऊन याच्या निविदा काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळांसदर्भात झाली चर्चा ; ‘असे’ होणार वाटप
- ‘वडेट्टीवार, भुजबळ फक्त घोषणा करत राहिले अन् प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले’
- ‘सरकारच्या पाठपुराव्या अभावीच ओबीसी आरक्षण रद्द’, खा. भागवत कराड यांचा आरोप
- ‘काही लोक पुनर्विचार याचिकेबाबत ट्विटर वरून माहिती देतायत, हे काय गौडबंगाल ?’
- दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराखाली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
