Share

मराठा आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक – अजित पवार

Published On: 

बीड : मुख्यमंत्री आणि संभाजीराजे, मराठा मोर्चा समन्वयकाची काल झालेली बैठक ही समाधानकारक झाली. असून त्यामध्ये झालेले निर्णय आहेत ते 15 दिवसात किंवा तीन आठवड्यात लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, सारथी संस्थेच्या योजनांसाठी निधीची कुठलीही अडचण येऊ देणार नाही. सारथी संस्थेने गरीब, गरजू नागरिकांच्या पर्यंत योजना पोचवून त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवावी. तसेच आरक्षणाच्या निकालामुळे विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठा समाजातील तरुणांना नियुक्ती देताना आर्थिक भार सोसण्यास शासन तयार आहे. असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे आणि मराठा समन्वयकांना दिले आहे. काल सह्याद्री अतिथीगृह येथे सुमारे ३ तास चाललेल्या बैठकीत हे आश्वासन देण्यात आले आहे.

तर, सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला ? त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही. तसेच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित आहे त्यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात येतील हा विश्वास बाळगा. समाजातील निवडक जणांची एक समिती नेमून त्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेले समाजाचे प्रमुख प्रश्न लगेच सोडविण्यासाठी समन्वयाने काम करू असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!