इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला फक्त एकच तास उरला आहे. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. आज दुपारी ठीक अडीज वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. आतापर्यंतच्या सगळ्यात प्रतिक्षेत असलेली नाणेफेक उडवली जाईल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता होणार आहे.
अशातच या लढतीच्या पहिल्या दिवशी काय चित्र असेल याचे अपडेट भारतीय खेळाडूंनी दिले आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पहिल्याच दिवशी मात्र पावसाचं सावट असल्याचं दिसत आहे. इंग्लंडमध्ये पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे हा पाऊस सामन्यात अडथळा आणू शकेल असा प्राथमिक अंदाज आहे.

अशात भारताच्या दोन खेळाडूंनी साउदम्प्टन येथील सध्याच्या परिस्थितीचे फोटो शेअर केले आहेत. फिरकीपटू आर अश्विनने त्याच्या इस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात पाऊस पडताना दिसत आहे. ऑलराउंडर रविंद्र जडेजाने देखील इस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ स्टोरी शेअर केली आहे. ज्यात पावसामुळे संपूर्ण खेळपट्टी आणि त्याच्या बाजूच्या भाग झाकण्यात आल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर
- नताशा, देवांगना, आसिफला मिळालेला जमीन सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा
- कल्पक उपक्रमासाठी सीईओ डॉ. गोंदावले यांचा शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने सत्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

