मुंबई : सध्या सोशल मिडिया हे प्रभावशाली माध्यम आहे. अनेक लोक खास करून तरूण वर्ग फेसबुक व इन्स्ट्राग्राम यांचा वापर मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे दिसते. मात्र असे असतना जेवढा याचा अधिक वापर ततेवढा अधिक धोका असल्याचे देखील दिसून येते. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मयूर फरताडे या युवकाने फेसबुक व इन्स्ट्राग्राममधील चूक निदर्शनास आणून दिली आहे. इतकेच काय तर यासाठी त्याला २२ लाखांचे बक्षीसही देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या या तरुणाची चांगलीच चर्चा होत आहे.
मयूर फरताडे सध्या कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत आहे. या युवकाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा एक बग शोधून काढला. त्या बगबाबतची माहिती मयूरने हॅकर्सच्या हातात येण्यापूर्वी फेसबुक व इन्स्ट्राग्रामला दिली आहे.
मयूर फरताडे ने शोधून काढलेला बग हा एखाद्या युजरला इन्स्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडिओही बघता येत होते. यासाठी त्या युजरला फाॅलो करणे गरजेचे नव्हते. फेसबुक व इन्स्टाग्रामला देखील या त्रुटींची कल्पना नव्हती. मात्र मयुरने ते दाखवून दिले.
मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती १६ एप्रिलला दिली होती. कंपनीने 15 जूनपर्यंत ही चूक सुधारली आणि मयूरला फेसबूकने २२ लाखांचे बक्षीसही दिले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सध्या मयुरचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर
- नताशा, देवांगना, आसिफला मिळालेला जमीन सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा
- कल्पक उपक्रमासाठी सीईओ डॉ. गोंदावले यांचा शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने सत्कार
- उस्मानाबादेत राष्ट्रवादीला आले उधाण; तीन मोठे नेते दौऱ्यावर


