Share

पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते विविध विकासकामांना प्रारंभ, नव्या बससेवेचेही उद्घाटन

Published On: 

लातूर: जिल्ह्यात आज दि. १८ जून रोजी पालकमंत्री अमित देशमुख यांनी विविध कामांचे उद्घाटन केले. बाभाळगाव येथील वैशाली नगर भागात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून राष्ट्रीय महामार्ग ते वैशाली नगर असा एक किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देशमुखांच्या हस्ते करण्यात आले. सदरील कामाचा दर्जा उत्तम राखून ते वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश याप्रसंगी त्यांनी तेथे उपपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच बाभळगाव येथील ग्राम सचिवालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात वैशालीनगर भागातील गोंड-राजगोंड समाजातील नागरिकांना ते राहात असलेल्या जागेचा मालकीहक्क कबाल्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात देशमुखांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या वतीने प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर बांधून देण्याची योजना आखली असून या सर्व लाभार्थ्यांना त्या योजनेनुसार पक्के घर मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने गंजगोलाई-बांधकाम भवन-वासनगाव-गंगापूर अशी विस्तारित बस सेवा सुरू करण्यात आली या सेवेचे उद्घाटन देखील पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज दि. १८ जून रोजी बांधकाम भवन, राजीव गांधी चौक येथून करण्यात आले. जिल्ह्यात आता कोव्हिड रुग्णांची संख्या कमी होत असून आता इतर थांबलेल्या कामांना चांगलाच वेग येत आहे. लॉकडाऊनमुळे रखडलेली कामे आता पुन्हा जोमाने सुरू होत असल्याचे सध्या दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!