मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजाचे आंदोलन पुन्हा सुरु झाले आहे. तर, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांवरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज मुबंईत बैठक झाली.
गेली अनेक वर्षे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक हे प्रलंबित असून सरकारसह विरोधकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, या स्मारकाबाबत गणेशोत्सवानंतर हालचाली होण्याची शक्यता आहे. विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत स्मारकाच्या परवानग्यांबाबत चर्चा केली.
विनायक मेटे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत गणेशोत्सवानंतर बैठक बोलावली जाणार आहे. शिवस्मारकाचा न्यायालयीन लढा अधिक वेगानं लढण्याचं आश्वासनही सरकारकडून मिळालं आहे.’ यासोबतच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाप्रमाणे राज्यात छत्रपती शिवाजी महाराज भवन बनवले जातील, असं देखील विनायक मेटे यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण करणार; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराडांचे आश्वासन!
- उदाहरण कसले द्यायचे हे नाना पटोले यांना समजतं का?, मनसेचा संतप्त सवाल
- राणे आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने ! ‘मुख्यमंत्र्यांशिवाय चिपी विमानतळाचे उद्घाटन शक्य’
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- केंद्राने महाराष्ट्राला दिलेला इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे – राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

