🕒 1 min read
मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात भारतीय महिला बॉक्सर लव्हलीना बोरगोहीनचा उपांत्य फेरीत विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीशी सामना होता. या सामन्यात लव्हलिना थोडीशी थकलेली दिसत होती. या सामन्यात लव्हलीना बोरगोहीनला ०-५ असा पराभवाचा सामना करावा लागला. मात्र पराभव जरी झाला तरीही लव्हलीनाने बोरगोहीनाने कांस्यपदक पटकावले.
My years of hard work has finally paid off. It was my dream to have an Olympic Medal and finally I can cherish that moment. My next goal would be to change the colour of the medal at 2024 Olympics. I'm dedicating this medal to the entire nation, who have been rooting for me. pic.twitter.com/Oxfa52wnOz
— Lovlina Borgohain (@LovlinaBorgohai) August 7, 2021
मात्र आता लव्हलीनाने २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे ध्येय तिची मनाशी पक्के केले आहे. तिने एक ट्वीट करत लिहिले की, ‘माझी वर्षानुवर्षांची मेहनत शेवटी फळाला आली. ऑलिम्पिक पदक मिळवणे हे माझे स्वप्न होते आणि शेवटी मी त्या क्षणाची कदर करू शकले. २०२४ ऑलिम्पिकमध्ये पदकाचा रंग बदलणे हे माझे पुढील ध्येय असेल. मी हे पदक संपूर्ण राष्ट्राला समर्पित करत आहे’, असे लव्हलिनाने म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सात पदके जिंकली आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारताची ही सर्वोच्च पदके आहेत. नीरज चोप्रा (सुवर्ण), मीराबाई चानू (रौप्य), रवी कुमार दहिया (रौप्य), बजरंग पुनिया (कांस्य), पीव्ही सिंधू (कांस्य), लवलिना बोर्गोहेन (कांस्य) आणि पुरुष हॉकी संघाने (कांस्य) पदक जिंकल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘औट्रम घाटातील बोगद्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक’ ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची चंद्रकांत खैरेंना ग्वाही!
- अखेर पुणेकरांची मागणी मान्य; सर्व दुकाने व सेवा रात्री ८ पर्यंत सुरु, तर शनिवार-रविवारी…
- मराठा क्रांती मोर्चाची पाच वर्षे; छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत साजरा होणार वर्धापनदिन!
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- विमानतळ विस्तारीकरणाची जमिन घ्या; अन्यथा आरक्षण हटवा, कृती समितीची मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
