Share

नितीश कुमारांच्या बिहारमध्ये गुंडाराज, 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून शेतात फेकले !

Published On: 

पटना : बिहारमध्ये दररोज शेकडो हत्या, लूटमार, अपहरण आणि बलात्काराच्या घटना, हेच भाजपच्या नेतृत्वाताली नितीश कुमार सरकारच्या मुख्य उपलब्धी आहेत असं म्हंटल तर अतिशोक्ती ठरणार नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सुशासनाचे दावे करतात. नितीशकुमार गुन्हे आणि गुन्हेगारांवर वचक बसविण्याच्या बाता करतात, मात्र बिहारमध्ये गुंडगिरीने कळस गाठला आहे.

अशातच बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित मुलीला शेतात बेशुद्धावस्थेत फेकून आरोपी फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संझा घाट गावात गवत कापण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी मीरगंज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

रविवारी मुलगी गवत कापण्यासाठी मक्याच्या शेतात गेली होती. आरोपी नितीश कुमार आणि मनीष कुमार हे दोघेही गावातच राहतात. मुलीचे तोंड दाबून ते तिला मक्याच्या शेतात घेऊन गेले. तिथे तिचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. बराच वेळ झाला तरी, मुलगी घरी आली नाही. त्यामुळे चिंतेत असलेले कुटुंबीय तिला शोधण्यासाठी गेले. मुलगी मक्याच्या शेतात बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर कुटुंबीय मुलीला घेऊन मीरगंज पोलीस ठाण्यात गेले. अशी माहिती पीडितेच्या आईने आणि मामीने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!