Share

‘वसुलीखोर अनिल देशमुखांनंतर आता वसुलीकांडाचे सूत्रधार अनिल परब यांचेही कांड बाहेर येणार’

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध ठिकाणांची झाडाझडती घेण्यास सीबीआयने सुरुवात केली आहे. देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत.

दरम्यान, अंबानी स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याने एका पत्रात मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्याने अनिल देशमुखांसह शिवसेनेचे प्रमुख नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर देखील खंडणीच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. यामुळे त्यांची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे काही कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवले होते. याच मुद्द्यावरून भाजपने अनिल परब यांना लक्ष्य केलं आहे. ‘कोरोनाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांच्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. कर्मचाऱ्यांना जीवन संपवण्याचा मार्ग निवडावा लागला. तुम्ही केलेल्या या पापाची शिक्षा तुम्हाला तुमच्याच वसुली कांडामुळेच मिळणार,’ असा घणाघात भाजपने केला आहे.

यासोबतच, ‘वसुलीखोर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयचा छापा पडल्यानंतर आता याच वसुलीकांडातील सूत्रधार अनिल परब यांचेही सगळे कर्मकांड बाहेर पडणार आहेत. याच कटात सामील असलेले काही भ्रष्टाचारी लोकं आता परबांना वाचवायला येऊ शकणार नाहीत. भ्रष्ट देशमुख आणि वाझेंसोबत कोट्यावधींचा वसुलीकांड करून हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांची खोटी शपथ घेताना तुम्हाला लाज वाटली नाही का? दुर्दैव हेच की बाळासाहेबांचेच पुत्र या भ्रष्ट अनिल परबची पाठराखण करत आहेत.’ असा प्रहार अधिकृत भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!