Share

लातूर जिल्ह्यातील अपंगांसाठीचे अनुदान अजूनही प्रतीक्षेत

Published On: 

लातूर: जिल्ह्यावर सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे व्यवसाय बंद आहेत तसेच ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यवर तर आर्थिक संकट ओढवले आहवे. सध्या कुठेच काम नसल्याने सामान्य नागरिक परेशान आहे, तसेच दिव्यांग बांधवांचे देखील असेच हाल आहेत. त्यांच्या साठी प्रशासनाकडून आर्थिक मदत दिली जात असते, मात्र अजूनही त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाहीये.

याच पार्श्वभूमीवर येथील सम्राट मित्र मंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील महानगरपालीका, नगरपालिका तसेच नगरपंचायत क्षेत्रातील अपंगाचे (दिव्यांगाचे) सर्वेक्षण करण्यात आले असून शासनाच्या निर्देशानुसार संबंधितांच्या खात्यावर हे अनुदान तातडीने वितरीत करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सम्राट मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नागरी क्षेत्रातील दिव्यांगाच्या प्रमाणानुसार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. संबंधीत महानगरपालीका/ नगरपालीका/ नगरपंचायत यांच्या कार्यालयाकडे या याद्या उपलब्ध आहेत. एकूण उत्पन्नापैकी तीन टक्के इतका निधी अपंगावर (दिव्यांगावर) खर्च करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे. मात्र अपंग (दिव्यांगा) चा निधी संबंधितांच्या खात्यावर टाकण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याच्या दिव्यांग बांधवांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे, अन्यथा दिव्यांगांसह आंदोलनाचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!