मुंबई : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदचा आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) मध्ये समावेश करण्याची चर्चा होती, परंतु तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बांगलादेश संघासोबतच राहिला. मशरफी मुर्तझाने यावर आपले मत दिले आहे. तस्कीन अहमदला आयपीएल सोडल्याबद्दल बक्षीस देण्याची मागणी त्याने केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या मध्यावर बीसीबीने तस्किनला ना-हरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेतला. आयपीएल फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्सने मार्क वूडच्या जागी स्पर्धेसाठी बोर्डाशी संपर्क साधला. मात्र, परवानगी न मिळाल्याने अँड्र्यू टाय याचा लखनऊमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मुर्तझा म्हणाला, ”तस्किनला नक्कीच बक्षीस मिळायला हवे. अँडरसन आणि ब्रॉडकडे बघितले तर इंग्लंड क्रिकेट बोर्ड काय करतेय ते लक्षात घ्या. असे केल्याने खेळाडूंना चांगले वाटते की बोर्ड त्यांचे कल्याण पाहत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : दुष्काळात तेरावा महिना..! दारुण पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादच्या कॅप्टनला १२ लाखांचा दंड
- IPL 2022: दारुण पराभवानंतर कर्णधार केन खेळाडूंवर संतापला; म्हणाला ‘या’ कारणामुळे झाला पराभव
- IPL 2022: संजू- बटलरच्या खेळीने राजस्थानची विजयी सुरुवात; सामन्यात रचले अनेक रेकॉर्ड्स
- मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस – सदाभाऊ खोत
- “त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर…”, ‘त्या’ प्रस्तावावरून भातखळकरांचा शरद पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

