🕒 1 min read
मुंबई – भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करुन पूरग्रस्तांसाठी तात्काळ केंद्राने मदत दिली असल्याचा संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकांनी कृपया यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केले आहे.केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत उत्तर देत असताना महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७०१ कोटींची मदत जाहीर केली असे वक्तव्य केले होते. मात्र ही मदत २०२० साली झालेल्या नैसर्गिक अतिवृष्टीबाबत आहे असे महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र सरकारने त्यावेळी केंद्राकडे ३ हजार ७२१ कोटींची मदत मागितली होती. त्यापैकी केवळ ७०१ कोटी मदत केंद्राने आता दिली आहे. ही विद्यमान पूरपरिस्थितीची मदत नाही असेही महेश तपासे यांनी ठणकावून सांगितले आहे.
केंद्रसरकारकडे ज्यावेळी ३ हजार ७०१ कोटींची मागणी केली त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ग्रामीण भागातील पूरग्रस्तांसाठी ४ हजार ३७५ कोटींची मदत दिल्याचेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले. भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करुन पूरग्रस्तांसाठी तात्काळ केंद्राने मदत दिली असल्याचा संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पदार्पण करताच पडिक्कलचा खास विक्रम ; ठरला पहिलाचं भारतीय फलंदाज
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
- शिखर धवनने दुसर्या टी -20 सामन्यात कोहलीचा विक्रम मोडत घेतली अव्वल स्थानी झेप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
