औरंगाबाद : एकवीस वर्षिय विवाहीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. ५) दुपारी घडली. स्वर्णा अंबादास जाधव (२२) विवाहीत तरुणीचे नाव असून किन्ही (ता.सोयगाव) येथील रहिवासी आहे.
पती वकील अंबादास जाधव हे सकाळी सोयगाव येथे न्यायालयात गेल्यानंतर काहि वेळाने घरातील मंडळी शेतीकामाला गेली. त्यानंतर स्वर्णाने घरातील छताच्या कडीला साडी बांधुन गळफास घेतला.
दुपारी पुतण्या गौरव हा घरी आल्यावर सदरील घटना उघड झाली. याबाबत पोलीसांनी घटनास्थळचा पंचनामा करून मृतदेह खाली उतरवुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येथे पाठविण्यात आला. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
महत्वाच्या बातम्या
- हटके अंदाजात सेहवागने धोनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- इंग्लंडच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी राशिद खानची अफगाणिस्ताच्या कर्णधारपदी निवड
- श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुन्हा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; चक्क क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा प्रयत्न
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ दोन केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

