मुंबई: इंगर्जी माध्यमांच्या शाळांची वाढती संख्या पाहता आता भाषिक शाळांकडे फारसं कोणी जात नसल्याचे चित्र आजकाल बघायला मिळत आहे. त्याच सोबत भाषिक शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांच्या संख्या देखील वरचेवर कमीच होताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनापुढे हे भाषिक शाळा टिकवून ठेवण्याचे मोठे आवाहन आहे. एवढे मोठे आवाहन असताना मात्र मध्येच असा काही प्रकार घडतो ज्यामुळे विद्यार्थ्यांची येणारी संख्या देखील आणखी कमी होण्याचीच शक्यता जास्त होते. उर्दू शाळेत मराठी शिक्षकाची नेमणूक केल्याचा अजब प्रकार मुंबईच्या विरार येथे घडला आहे (marathi teacher appointed in urdu school).
विरारमध्ये मात्र जिल्हा परिषदेचा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषेदेनं येथील एका उर्दू शाळेत चक्क मराठी शिक्षकाची नेमणूक केली आहे. संबंधित शिक्षकाला उर्दू येत नसल्याने शाळेच्या व्यवस्थापकीय समितीने मराठी शिक्षकाला माघारी पाठवलं आहे. तसेच उर्दूचं ज्ञान असणाऱ्या शिक्षकाची मागणी केली आहे. या शाळेत सध्या २४२ विद्यार्थी शिकत असून या शाळेला केवळ दोन शिक्षक आहे. संबंधित दोन शिक्षक मागील दहा वर्षांपासून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. आणखी दोन शिक्षकांची २०१७ साली नेमणूक केली होती मात्र त्यांची बदली करण्यात आली.
सध्या या शाळेला विज्ञान, गणित आणि इंग्रजीसाठी प्रत्येकी २ शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यासाठी व्यवस्थापकीय कमिटीने जिल्हा परिषदेकडं शिक्षकांची मागणी केली होती. पण जिल्हा परिषदेनं थट्टा करत उर्दू शाळेसाठी मराठी शिक्षकाची नेमणूक केली आहे. जिल्हा परिषदेचा हा भोंगळ कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषदेच्या या निष्काळजीपणामुळे भाषिक शाळा टिवून ठेवणे खरंच कठीण होऊन बसणार यात काही शंका नाही.
महत्वाच्या बातम्या:
- ‘नाकर्तेपणाचं पाप झाकण्यासाठीच कोरोनावर खापर फोडलं’, नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंना पत्र
- ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर; ‘या’ बड्या नेत्यांची घेणार भेट
- IIT मुंबईचे माजी विद्यार्थी पराग अग्रवाल ट्विटरचे ‘CEO’
- चिंता वाढली! दक्षिण अफ्रिकेतून परतलेली व्यक्ती पॉझिटिव्ह
- ‘खोटं बोल पण रेटून बोल हेच ठाकरे सरकारचे धोरण!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

