Share

चिंता वाढली! दक्षिण अफ्रिकेतून परतलेली व्यक्ती पॉझिटिव्ह

Published On: 

चंदीगड: मागील दोन वर्षापासून संपूर्ण जगभरात हाहाकर माजवलेल्या कोरोना (Corona) व्हायसरमुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला. मात्र सध्या कोरोनाच्या या भयावह परिस्थितीनंतर आता कोठे सर्व पूर्वपदावर येत असताना आता पुन्हा एकदा जगापुढे एक नवं संकट उभं राहिलं आहे.

दक्षिण अफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ (Omicron) या विषाणूमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. ‘ओमिक्रॉन’ हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावापासून देशाला वाचवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार नियम लागू करताना दिसत आहेत.

मात्र आता देशातील ‘ओमिक्रॉन’ ची चिंता अधिकच वाढली आहे, कारण चंदीगडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या एका व्यक्तीची COVID-19 साठी सकारात्मक चाचणी झाली आहे. आफ्रिकेतून परतलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य आणि आणखी एकजण पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना व्हायरसचा हा कोणता व्हेरियंट आहे, हे शोधण्यासाठी नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यानुसार पुढील निर्णय घेतले जातील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता देशाची चिंता अधिकच वाढली आहे.

दरम्यान, नव्या विषाणुने पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देखील नवे नियम जारी करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार जर कोणी विनामास्क आढळले तर त्याच्याकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तसेच एखादा ग्राहक विनामास्क खरेदी करताना दिसल्यास संबंधित दुकानदाराकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!